परदेशातून अवैधरित्या फटाके आयात केल्यास कडक कारवाई होणार
 महा त भा  13-Sep-2017

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची सूचना


 

नवी दिल्ली : अवैधरित्या फटाक्यांची आयात करण्यावर सन १९९२ रोजीच्या बंदी आदेशानुसार अंमलबजावणी यावर्षी काटेकोरपणे व्हावी यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे, असे स्पष्ट निर्देश उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने जारी केले आहेत. तरीही सुरक्षा यंत्रणांना चुकवून देशात अवैधपणे फटाक्यांची आयात झाल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.


उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरयुक्त फटाके बनवणे, साठा करणे, विक्री व उपयोग करणे अवैध आहे. १७ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे फटाके निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात कामाला लागला आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे.


याविषयी मंत्रालयाने म्हटले आहे की, औद्योगिक नीति आणि संवर्धन विभागाला देशात होणाऱ्या फटाक्यांच्या अवैध आयातीविषयी सातत्याने माहिती मिळत आहे. खोट्या माहितीच्या आधारे औद्योगिक नीति आणि संवर्धन विभागाला फसवणूक बंदी असलेली फटाके निर्मितीची साधने अथवा फटाके देशात आल्यास असे कृत्य तस्करी कायद्या अंतर्गत धरण्यात येऊन कठोर पावले उचलली जातील.


औद्योगिक नीति आणि संवर्धन विभागातील पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा यंत्रणेने विस्फोटक नियम २००८ अंतर्गत फटाक्यांच्या आयातीविषयी कोणतेही परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे अवैधपणे फटाके हाताळणे हे कायद्याने गुन्हा ठरणार आहे.

Embeded Object