सिंगापूरला मिळाल्या पहिल्या महिला राष्ट्रपती
 महा त भा  13-Sep-2017सिंगापूर :
सिंगापूर येथे पहिल्यांदाच एका महिलेची राष्ट्रपती पदावर निवड झाली आहे. हलीमा याकूब या सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. भारतीय वंशाच्या हलीमा सिंगापूर येथील पीपल्स एक्शन पार्टीच्या खासदार होत्या. याआधी त्यांच्याकडे सामुदायिक विकास तसेच खेळ मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. विरोधकांकडे त्यांच्या विरोधतात कुणीच उमेदवार नसल्याने त्यांची राष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

Embeded Object


मलय या अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातून येणाऱ्या हलीमा याकूब या संसदेच्या माजी अध्यक्षा होत्या. सिंगापूर येथे दशकांपासून एकच पक्ष सत्तेत आहे, त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक न होण्याची ही काही पहिली वेळ नाही. मात्र अल्पसंख्यांक महिलेला राष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मात्र अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका देखील केली आहे. निवडणूक न लढवताच राष्ट्रपती पद दिल्याने अनेक लोकांनी आपला असंतोष व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रपती पद अल्पसंख्यांक मलय समुदायासाठी आरक्षित होते. राष्ट्रपती पद मिळाल्यानंतर हलीमा याकूब यांनी "मी केवळ आरक्षित समाजाचीच नाही तर सगळ्यांची राष्ट्रपती आहे. माझे कार्य प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी असेल." हलीमा याकूब यांनी राजकारणाचा मोठा अनुभव आहे.