अमरावती होतंय फुटबॉलमय
 महा त भा  13-Sep-2017


फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन

अमरावती : फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्या १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेला येत्या ६ ऑक्टोंबरपासून सुरुवात होत आहे. यास्पर्धेनिमित्त महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मिशन वन मिलीयन’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात फुटबॉल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील व्हीएमव्ही महाविद्यालयात पालकमंत्री प्रविण पोटे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली आहे.


शेकडो विद्यार्थांच्या सहभागामुळे यावेळी रॅलीला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले होते. 'अवघ्या महाराष्ट्र फुटबॉलमय' या घोषनेनी महाविद्यालयाचा सर्व परिसर धूमधूमून गेला होता. महाविद्यालयात तसेच रॅलीमार्गात अनेक ठिकाणी फुटबॉलसेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.


फिका या संघटनेनी १७ वर्षाखाली फुटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात करण्याचे ठरवले आहे. हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. फुटबॉल हा जगातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. भारतात देखील तो लोकप्रिय व्हावा, तसेच देशातील खेळाडूंनी क्रिकेट प्रमाणेच या खेळात देखील देशाचे नाव उंचवावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रात 'महाराष्ट्र मिशन वन मिलीयन’ हा उपक्रम साजरा करण्यात आला आहे. जेणे करून महाराष्ट्रातील मुलांमध्ये या खेळाविषयी जागृती व्हावी व या खेळात त्यांनी चमकदार कामगिरी करावी,' असे माहिती पोटे यांनी यावेळी दिली.