पूँछ येथे पुन्हा पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
 महा त भा  13-Sep-2017पूँछ (जम्मू काश्मीर) : जम्मू काश्मीर येथील पूँछ येथे पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने पूँछच्या देगवार आणि अखनूर येथील परगवाल येथे गोळीबार केला. तसेच शाहपुर आणि करमाडा येथून देखील पाकिस्तानचा गोळीबार अद्याप सुरुच आहे.

या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्यूत्तर दिले आहे. त्यांनी देखील गोळीबाराला उत्तर देत उलट गोळीबार केला. या चकमकीत एक स्थानिक नागरिक जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामुळे तेथे तणावाची परिस्थीती निर्माण झाली असून, आसपासच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही महीन्यांमध्ये पाकिस्तानकडून अनेकवेळा गोळीबार करण्यात आला आहे, तसेच असंख्यवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले असून या हल्ल्यांना भाराताने देखील चोख प्रत्यूत्तर दिले आहे. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर भारतीय सैन्याला कठोर पावले उचलणे भाग पडेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.