जन धन योजनेअंतर्गत शून्य बॅलेंस असलेल्या खात्यांची संख्या कमी - अरूण जेटली
 महा त भा  13-Sep-2017


नवी दिल्ली :  मागील तीन वर्षात ७७ टक्के बँक खात्यात शून्य बॅलेंस होता, मात्र आता हे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत शून्य बॅलेंस असलेल्या खात्यांची संख्या आता कमी झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केले. नवी दिल्ली येथे यूएन इन इंडियाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी जन धन रेवॉल्यूशन कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

Embeded Object

Embeded Object


जन धन योजनेला सुरूवात झाली तेव्हा सुमारे ४२ टक्के भारतीय कुटुंबं बँक यंत्रणेच्या बाहेर होती. मात्र, लोकांकडे घरात आता किमान एक तरी बँक खाते आहे. तसेच वंचित वर्गासाठी उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या अधिक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २०१४ साली प्रधानमंत्री जन धन योजनेला सुरूवात केली. तसेच बँकांच्या मदतीने ती पूर्ण देशात राबवली. प्रधानमंत्री जन धन य़ोजनेअंतर्गत २ महत्वाच्या विमा योजना आणि पेन्शन योजना जोडल्या गेल्या आहेत. लोकांनी खाते उघडणे आणि ते वापरायला लावणे हे प्रारंभी मोठे आव्हान होते. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाचा विस्तार जेवढा जास्त असेल तितकेच पीएमजेडीवाय योजनेचे खाते अधिक कार्यरत राहील.

Embeded Object

विमुद्रीकरणानंतर रोख रक्कम कमी

विशेषत्वाने विमुद्रीकरणानंतर समाजातील रोख रक्कम कमी करण्यासाठी जास्त भर दिला गेला आहे. विमुद्रीकरणामुळे रोख रक्कम कमी झाली, कर आकारणीत वाढ झाली आणि अर्थव्यवस्थेतील औपचारिकीरण हे परिणाम दिसून आले आहेत.

 


आधार ही पूर्ण विकसित कल्पना


ज्यावेळी आधार आणले गेले तेव्हा त्याच्या पूर्ण क्षमतेची कल्पना नव्हती, मात्र आधार ही एक पूर्णपणे विकसित कल्पना होती. आधार कायद्याच्या चाचणीत पूर्णपणे यशश्वी होईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Embeded Object