आयफोनचा थक्क करणारा नवीन मॉडेल पाहिलंय का ?
 महा त भा  13-Sep-2017कॅलिफोर्निया : जग प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल ही नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोनमुळे जगातील अनेकांना भुरळ घालते. उतम प्रतीचे हार्डवेअर आणि वेगवेगळ्या फीचर्समुळे अॅपलच्या आयफोन सिरीजची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षी आयफोन ७ सादर केल्यानंतर आता आणखीन वैशिष्ट्य मोबाईल फोन ग्राहकांनासमोर आणण्यासाठी अॅपल सज्ज झाली आहे.


येत्या तीन नोव्हेंबरला अॅपल आपला आयफोन एक्स हा नवीन मोबाईल बाजार उतरवणार आहे. अनेक नवनवीन फीचर्स या मोबाईलमध्ये भरणा केलामुळे पाहताच क्षणी ग्राहकांमध्ये या मोबाईल विषयी कुतूहल निर्माण होऊ लागले आहे. आयफोनची ओळख असलेले होम की यामधून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे या मोबाईलमध्ये फेस आणि आय अॅक्सेसिंग देण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्याने इशारा करून किंवा मोबाईल तुमचा चेहरा पाहून अनलॉक होईल. याच बरोबर हा मोबाईल वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहे.


मोबाईल चॅटिंग अधिक मनोरंजक व्हावी, यासाठी देखील मोबाईल काही फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये अॅनीइमोजी नावाचे नवीन फिचर ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांच्या हालचाली प्रमाणे इमोजी बोलताना आणि हसताना दिसतील. हल्ली तरुणाईला मोबाईलमधील जास्त आकर्षित करणारा भाग म्हणजे मोबाईल कॅमेरा आयफोन एक्स मध्ये अत्यंत उच्च दर्जाचे कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याच बरोबर फोटो अॅडीटींगसाठी देखील अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फोटो काढण्याचा अनुभव अनेक पट्टीने वाढणार आहे.


याच बरोबर आणखीन काही थक्क करणारे नवीन फीचर्स या मोबाईलमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये या फोनविषयी कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. येत्या ३ नोव्हेंबरला कंपनी हा मोबाईल ग्राहकांसमोर सादर करणार आहे. त्याच्या अंदाजे डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे.

Embeded Object