जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर
 महा त भा  13-Sep-2017

 

गुजरात: जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे हे आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुजरातच्या विमानतळावर शिंजो अॅबे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. गुजरातच्या विमानतळावरून नरेंद्र मोदी आणि शिंजो अॅबे यांचा ताफा सरळ गुजरातमधील साबरमती आश्रमावर पोहोचणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

 

 Embeded Object

 

विमानतळ ते साबरमती आश्रमादरम्यान असणाऱ्या साडे आठ किलोमीटरच्या प्रवासात नरेंद्र मोदी आणि शिंजो अॅबे हे एका रोड शोमध्ये भाग घेणार असून एका परराष्ट्र नेत्यासोबत नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रोड शो असणार आहे. उद्या गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत-जपान यांच्या १२ व्या वार्षिक शिखर बैठकीत शिंजो अॅबे उपस्थित राहणार आहेत.

 

 Embeded Object

 

या सोबतच हे दोन्ही नेते अहमदाबाद आणि मुंबई या दोन शहरांनदरम्यान धावणारी भारतातील पहिली बुलेट रेल्वेच्या प्रकल्पाचा पाया रचणार आहेत. शिंजो अॅबे यांच्या स्वागतासाठी गुजरात सज्ज झाले आहे. विविध दिव्यांच्या रोषणाईने गुजरातला सजविण्यात आले आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि जपानचे संबंध अजून घट्ट होण्यास मदत मिळणार आहे.

 

Embeded Object