मोदींनी शिन्जो अॅबेंना भेट दिली गांधीजींची तीन माकडं
 महा त भा  13-Sep-2017


 

अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबें दोन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत त्यांनी आज साबरमती आश्रमाला भेट दिली. तेथे महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध 'बुरा मत देखो' 'बुरा मत बोलो' आणि 'बुरा मत सुनो' असा संदेश देणारी तीन माकडं जपानी पंतप्रधानांना भेट म्हणून मोदी यांनी दिली आहे.


शिन्जो अॅबे व त्यांच्या पत्नी एकी अॅबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या साबरमती आश्रमाला भेट द्यायला गेले होते. अॅबे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली असून, त्यांनी आश्रमातील विविध दालनाला भेट दिली.


या भेटीची आठवण तथा गांधीजींची शिकवण म्हणून तीन माकडांची मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट म्हणून जपानी पंतप्रधानांना दिली आहे. हा या भेटीतील एक चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Embeded Object