तुम्हालाही अनुभवायचाय का, मोटारकारचा असा थरार?
 महा त भा  13-Sep-2017

 


 
अतिशय अवघड वळणे, तीव्रउतार , खडकाळ तसेच संपूर्ण चिखलयुक्त रस्ता, अशा रस्त्यांवर चालक व मोटारकारचे खरे कौशल्य पणाला लागते, अशा अनेक जबरदस्त थरारक स्पर्धा आजपर्यंत तुम्ही टीव्ही किंवा युट्यूबवर बघितल्या असतील पण आता थेट अशा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी पुणेकरांबरोबरच देशभरातील मोटारकार प्रेमींना मिळणार आहे. 'पुणे पाथफाईंडर्स' यांच्या वतीने १६ व १७ सप्टेंबर रोजी 'ऑफ रोड कार्निवल २०१७'  या मोटारस्पोर्ट अजिंक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
या अनोख्या स्पर्धेविषयी खास 'महा त भा'शी बोलताना स्पर्धेचे संयोजक संदीप आनंद म्हणाले की, ''हि स्पर्धा अतिशय थरारक व चालकांचे कौशल्य पणाला लावणारी आहे. पुण्यातील वाघोली येथील सातव पाटील फार्म्स मधील ४०० एकर परिसरात या स्पर्धेसाठी विशेष ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या स्पर्धेत या विषयी आवड असणाऱ्या व्यक्ती फोरव्हिल ड्राईव्ह कारसह (फोरबायफोर) सहभागी होऊ शकतात. ट्रॅक्टर किंवा व्यावसायिक मोटारकार याना स्पर्धेत प्रवेश नाही. पेट्रोल कार, डिझेल कार आणि विशेष मोटारकार असे तीन गट प्रामुख्याने या स्पर्धेसाठी करण्यात आले आहेत. स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्यासाठी स्पर्धकांना तब्बल आठ आव्हानात्मक 'स्टेज' पार कराव्या लागतील.''
 

 
महाराष्ट्रातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अकलूज, नागपूर या महत्वाच्या शहरातून त्याचबरोबर देशभरातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. एकूण ५० स्पर्धकांना यामध्ये भाग घेता येईल. समीर चुनावाला, सेड्रिक डिसिल्वा, डौलात चौधरी, जीत तपस्वी, अजित बच्चे यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचाही या स्पर्धेत सहभाग असेल. ऑफ रोड स्पर्धेत स्पीड हा मुख्य भाग नसून संयम, सांघिक कामगिरी आणि मोटारीवरचे नियंत्रण या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. तसेच स्वतःची व गाडीची सुरक्षा आणि पेनल्टीज याचाही यात गांभीर्याने विचार करावा लागतो असे  'पुणे पाथफाईंडर्स'चे गगन सेठी यांनी सांगितले. 
 

 
 'ऑफ रोड कार्निवल २०१७'  या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा सहभागासाठी नोंदणी करण्याकरता तुम्ही ९७६५०१६७७७ (विशाल चव्हाण) या क्रमांकावर संपर्क करू शकता. 
 
'पुणे पाथफाईंडर्स'तर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या अशाच स्पर्धेचा थरार तुम्ही खालील व्हिडिओ मधून बघू शकता.. 
 
Embeded Object
 
Embeded Object