कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत स्थानिक पातळीवरील रोजगाराला प्राधान्य देणार
 महा त भा  13-Sep-2017


 

मुंबई :  या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पर्यंटनविषयक सुविधांच्या बांधकामावर ८० टक्क्यांपर्यंतचा खर्च करण्यात येणार असून २० टक्के खर्च हा प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी, पर्यटनदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गावांच्या सौंदर्यस्थळांच्या बळकटीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

 

कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 'कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम' सुरू करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Embeded Object

 

ग्रामविकास राज्यमंत्री म्हणाले,  कोकण विभागातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटन पूरक उद्योग उभारण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना ४ टक्क्यांच्या वरील मात्र १२ टक्क्यांच्या मर्यादेत व्याजाच्या रकमेचा फरक राज्यस्तरीय समितीमार्फत मंजूर करण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत ४५ कोटींची विकासकामे प्रस्तावित असून अनेक ठिकाणची कामे सुरू झालेली आहेत. गावातून पर्यटन स्थळांपर्यंत पोहचण्याच्या रस्त्याची बांधणी, विद्युत व्यवस्था, वाहनतळ उभारणे यांसारखी कामे या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आली आहेत. शासनामार्फत त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमांतर्गत १ कोटींपर्यंतच्या छोटछोट्या प्रकल्पांना मान्यतेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.