कुलभूषण जाधव प्रकरणी आयसीजे आज पुन्हा करणार सुनावणी
 महा त भा  13-Sep-2017


नेदरलँड : भारतीय वायुदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षे प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आज पुन्हा एकदा सुनावणी करणार आहे. मागील सुनावणीत जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. व निकाल पुढे ढकलला होता. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालय आज कोणता निकाल देणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.


'कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तान अत्यंत प्रभावीपणे मांडत असून पाकिस्तानमध्ये उभारण्यात येत असलेल्या सिपेक (CPEC) विरोधात भारत करत असलेल्या दहशतवादी कारवायांचा जाधव म्हणजे एक पुरावा आहे. त्यामुळे हे प्रकरण पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे' असे वक्तव्य पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री अहसन इकबाल यांनी केल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. दरम्यान जाधव यांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी भारताने देखील आपली कंबर कसली आहे. भारताकडून कुलभूषण जाधव यांची बाजू लढवत असलेले भारतीय वकील हरीश साळवे हे पूर्ण तयारीनिशी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी नेदरलँडमध्ये दाखल झाले आहेत.

 

काय आहे प्रकरण ?

कुलभूषण जाधव हे भारतीय वायू दलाचे माजी अधिकारी असून हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना इराणमधून अटक केली होती. यानंतर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावत पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यावर भारताने आक्षेप घेत, जाधव प्रकरणी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे ला भारताच्या बाजूने निकाल देत, जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. तसेच अंतिम निकाल राखून ठेवला होता. .