हिंदू दाम्पत्यांना घटस्फोट हवा असल्यास ६ महिन्याच्या प्रतिक्षेची गरज नाही - सर्वोच्च न्यायलय
 महा त भा  13-Sep-2017


दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काल झालेल्या सुनावणीत हिंदू दाम्पत्यांच्या घटस्फोटाच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे हिंदू दाम्पत्यांना परस्पर सामंजस्याने घटस्फोट हवा असल्यास त्यांना आता सहा महिने प्रतिक्षा करण्याची गरज पडणार नाही. घटस्फोटाला दोघांची मान्यता असेल तर घटस्फोट आठवड्याभरात मिळू शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती ए के गोयल आणि न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली होती.


१९५५च्या हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या दाम्पत्याल घटस्फोट हवा असल्यास अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. तसेच या कालावधादरम्यान त्यांचे समुपदेशनही केले जाते. मात्र तरिही ते आपल्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असतील तर त्यांना कायदेशीररित्या घटस्फोट दिला जातो. जर एखादे दाम्पत्य घटस्फोटाचा अर्ज कऱण्याआधीपासून वेगळे रहात असेल आणि परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेण्याची तयारी असेल तर अशा परिस्थिती सहा महिन्यांच्या कालावधीची अट रद्द केली जाऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे.


घटस्फोटाशी संबंधित तयार केलेल्या कायदा १३ बी ( २ ) नुसार सहा महिन्यांचा कालावधी असणे आवश्यक आहे, मात्र ही अट अनिवार्य नाही असे न्यायालयाने सांगितले आहे.