अत्याचार करणाऱ्याला विजेचा झटका देणारी चप्पल बघितली का?
 महा त भा  13-Sep-2017हैदराबाद :  थोड्या फार प्रमाणात छेडछाड (इव्ह टीझींग)चा अनुभव प्रत्येकाच मुलीला तरुण वयात, किंबहुना त्यानंतरही येतो. अनेकदा ती केवळ छेडछाड नसून त्याचे रुपांतर अत्याचारात व्हायला लागते, आणि त्यातून अॅसिड अटॅक, बलात्कार असे अनेक गुन्हे घडतात. अशा वेळी मुलींने काय करावे? स्वत:चे रक्षण करण्यासाठी मुलींने ज्युडो कराटे किंवा तस्तम काही शिकणे तर आवश्यकच आहे, मात्र अगदी धोक्याच्या वेळी काही सुचले नाही, तर मुली एक लाथ तर नक्कीच मारु शकतात, पण त्याची शक्ती जाणवण्यासाठी देखील काही तरी करणे आवश्यक आहे, यासाठी हैदराबाद येथील एका १८ वर्षीय तरुणाने विशेष चप्पलचा निर्माण केला आहे.
सिद्धार्थ मंडाला असे या चपलेचा निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. "अनेकदा मुली आपल्यासोबत काळामिरेच्या स्प्रे, किंवा मिर्चीचा स्प्रे न्यायला विसरतात, मात्र त्या या इलेक्र्टिक चपला घलणे विसरु शकत नाहीत. या चपलांमध्ये इलेक्ट्रिक वायर बसविण्यात आल्या आहेत, मुलींने धोक्याच्या परिस्थितीत याचा वापर हल्ला करणाऱ्यावर केला, तर समोरच्या माणसाला जोरदार झटका बसू शकतो, ज्यामुळे मुलींना जीव वाचविण्याचा वेळही मिळेल आणि हल्ला करणाऱ्याला प्रत्युत्तर देखील देण्यात येईल." असे या विद्यार्थ्याने सांगितले आहे.

खऱ्या जीवनात याचा कितपत वापर करता येईल हे आता सांगता येणार नाही. यामुळे चप्पल घालणाऱ्याला तर इजा होणार नाही, झटका लागणार नाही किंवा इतर कुठला धोका तर नाही ना? असे प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. मात्र हा एक अभिनव प्रयोग देखील ठरु शकतो. वापर केल्यानंतरच याचा खऱ्या अर्थाने कसा उपयोग करता येईल हे स्पष्ट होवू शकेल.