आता गुगल ट्रान्स्लेटद्वारे ७ भारतीय भाषांत भाषांतर करणे अधिक सोपे
 महा त भा  13-Sep-2017


 

अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी गुगलने आठ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करता यावेत याकरिता अधिक चांगले फिचर्स उपलब्ध केले आहेत. यामध्ये मराठी, बेंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या. गुगलने दिलेल्या नव्या फिचर्समुळे या भारतीय भाषांमधील भाषांतर सुकर होणार आहे. गुगल ट्रान्स्लेट हे अॅप्लीकेशन किंवा वेबपेजवरून भाषांतर करताना ऑनलाइन सेवा आधीपासून उपलब्ध होती. आता नेट नसतानाही भाषांतर करता येणार असल्याने अनेकांना या सेवेचा मोठा उपयोग नक्कीच होऊ शकतो.


भारतातील इंटरनेट सेवा सर्वदूर चांगली नसल्याने कित्येक ठिकाणी गुगलच्या सेवा वापरणे लोकांना शक्य होत नाहीत. याचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त हिंदीत भाषांतर करण्यासाठी ऑफलाइनचा पर्याय उपलब्ध होता.


ऑफलाइन ट्रान्सलेशन सेवा वापरण्यासाठी पूर्वतयारी अशी करा..

१. गुगल प्ले स्टोअरवरून गुगल ट्रान्स्लेट हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करा.
२. वायफायला कनेक्ट असताना आपल्याला आवश्यक भाषा निवडून त्याचे पॅक डाऊनलोड करा.
३. नेट बंद करून ट्रान्स्लेट अॅप सुरू करा.
४. तुम्ही इंग्रजी भाषेत किंवा आवश्यक भाषेत शब्द टाइप केल्यावर ज्या भाषेत भाषांतर हवे आहे तो पर्याय निवडा.


आज गुगलने केलेल्या बदलांनुसार आता तुम्ही गुगल ट्रान्स्लेट अॅपवर टाइप न करता फक्त आवाजाने टाइपिंग करू शकता. आवाज ओळखून त्यानुसार शब्द स्क्रीनवर दिसतात. तसेच तुम्हाला कॅमेरा शोधायचा असेल तरी गुगल सर्चला कॅमेरा असे म्हणल्यास लगेच सर्च केला जातो. कॅमेराद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या चित्रांवरूनही गुगल ट्रान्स्लेटला भाषांतर करता येणार आहे, असा अविश्वसनीय अपडेटही या वेळी देऊन गुगले युजर्सना एक वेगळी भेट दिली आहे.


नऊ भारतीय भाषांतील संवादाचे तत्काळ भाषांतर शक्य


आतापर्यंत परकीय भाषांमधून भाषांतराची सुविधा होती, आता तमीळ भाषेतून मराठीत, बंगालीतून कन्नड भाषेत किंवा मराठीतून उर्दू भाषेत या पद्धतीने भाषांतर करता येणे शक्य होणार आहे. या अपडेटमुळे भारतीय भाषा शिकणाऱ्यांसाठी मोठी मदत मिळू शकेल. तसेच आपल्याला माहित नसलेल्या ९ भारतीय भाषेतून कोणी तुमच्याशी संवाद साधत असेल तर तुम्ही गुगल ट्रान्स्लेट अॅप्लीकेशन सुरू करून स्पीक या ऑप्शनवर क्लीक केल्यावर समोरच्या व्यक्तीचा आवाज ओळखून वरील नऊ भाषांमध्ये इन्स्टंट भाषांतर उपलब्ध होईल. यामध्ये बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तमीळ, तेलुगु, उर्दू अशा भाषांचा समावेश आहे.


ही सुविधा ऑफलाइन ५९ भाषांसाठी सुरू असून, गुगल लेन्स ही फोटोवरून भाषांतर करणारी सुविधा ३७ भाषांसाठी उपलब्ध आहे. तर व्हॉइस ट्रान्स्लेशन सुविधा ६६ तर संवाद साधण्यासाठी इन्स्टंट ट्रान्स्लेशन सुविधा ४० भाषांमध्ये सुरू आहे.

Embeded Object