जागतिक वारसा लाभलेल्या अहमदाबादमध्ये आज उत्सवमय वातावरण
 महा त भा  13-Sep-2017


अहमदाबाद : जागतिक वारसा लाभलेल्या अहमदाबाद शहरात आज दुपारपासूनच उत्सवमय वातावरण आहे. सध्या नवरात्री नाही, मात्र तरी देखील अहमदाबादच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गरबा सुरु आहे. कारण आहे जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे यांचा अहमदाबाद दौरा.


जपानचे पंतप्रधान शिन्जो अॅबे आणि त्यांच्या पत्नी एकी अॅबे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. अहमदाबादच्या साबरमती रेल्वे स्थानकावर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन त्यांच्या व पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तेथे जाताना अॅबे यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

Embeded Object

Embeded Object
त्या पार्श्वभूमीवर ठीक-ठिकाणी अॅबे यांचे स्वागत केले जात आहे. अनेक ठिकाणी गरबा सुरु आहे. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. अन्य नागरिक भारत आणि जपानचे झेंडे घेऊन अॅबे यांच्या स्वागतासाठी उभे दिसत आहेत.

 

विशेष म्हणजे अहमदाबाद येथे दाखल झाल्यापासून अॅबे दाम्पत्य देखील भारतीय वेश परिधान केला आहे. शिन्जो अॅबे यांनी कुर्ता आणि जॅकेट परिधान केले असून त्यांच्या पत्नी एकी अॅबे या सलवार कमीज या वेशभूषेत नजरेस पडत आहेत. त्यांच्या या पोषाखाचे देखील कौतुक केले जात आहे.

Embeded Object