तीन पोरांनी कमविले तीन करोड 

    13-Sep-2017
Total Views |

 


 
'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटानंतर विशाल देवरुखकर या तरुण दिग्दर्शकाने 'टीनएज' मधील तीन मुलांना सोबत घेऊन 'बॉईज' हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. अवधूत गुप्ते हा या चित्रपटाचा प्रेझेंटर आहे. राष्ट्रीय पारितोषिक मिळविलेला पार्थ भालेराव हा कलाकार सोडला तर उरलेले प्रमुख दोघेही तसे अभिनयात नवखेच होते. पण तरीदेखील अनपेक्षितरित्या सध्या हा चित्रपट सुपरहिट ठरला असून कालपर्यंत या चित्रपटाने तीन करोड ७२ लाख रुपयांची कमाई केली होती. 'बॉईज' बरोबरच सुबोध भावे व सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण तो 'बॉईज'च्या तुलनेत खूपच मागे राहिला आहे. 
 
 
वरील आकडेवारी सिद्ध करणारी पोस्ट अवधूत गुप्तेने ट्विटरवर टाकली आहे. वर वर पाहता 'टीनएज', त्यांची धमाल किंवा प्रेम प्रकरण असा या चित्रपटाचा विषय असावा असं वाटलं होतं. पण या चित्रपटाने एका वेगळ्याच विषयाला हात घातला असून रसिकही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत. 
 
 
सनी लिओनच आयटम सॉंग हा देखील या चित्रपटाचा एक प्लस पॉईंट मानला जात आहे. त्याचबरोबर 'लग्नाळू' हे गाणं मोठ्या पडद्यावर पाहताना तर प्रेक्षक अक्षरशः बेभान झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. येत्या शुक्रवारी 'उबुंटू' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण 'बॉईज' व 'उबुंटू' या दोन्हीचे विषय वेगळे असल्याने 'बॉईज' च्या कमाईमध्ये पुढील आठवड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.