पण स्मृती इराणी 'नरेंद्र मोदींच्या प्रसारण मंत्री'! - काँग्रेस प्रवक्ता
 महा त भा  12-Sep-2017


नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांच्या केंद्रीय प्रसारण मंत्री पदावरून भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतले आहेत. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ काँग्रेस नेता आनंद शर्मा म्हणतात, कॅलिफोर्नियात राहुल गांधींनी केलेल्या भाषणात देशाचे पंतप्रधान मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत. पण स्मृती इराणी मात्र ‘मोदींच्या प्रसारण मंत्री’ आहेत. शर्मा यांनी इराणी यांच्या केंद्रीय मंत्री पदावरील नियुक्तीबाबत अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिह्न उपस्थित केले आहेत. याआधी राहुल गांधी यांनी आज अमेरिकेतील बर्कले येथे केलेल्या भाषणावर भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया स्मृती इराणी एका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली होती.

Embeded Object

 

‘सध्या भारतात जे काही घडत आहे, ज्यात विघटन व विभाजन करणे, घृणा व हिंसा पसरवणे आणि लोकांवर विशिष्ठ विचार थोपण्याचे पंतप्रधान मोदींंचे प्रयत्न देशामध्ये लपवता येतील. पण आंतराष्ट्रीय स्तरावर मात्र या गोष्टी लपून राहणार नाहीत’. असे म्हणत आनंद शर्मा म्हणतात, “राहुल गांधींनी या भाषणाने विदेशात भारताचा सन्मान वाढवला आहे. भारताचा अपमान परदेशात कोणी केला असेल तर तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच! यापूर्वीच्या शासनकाळात भारत एक भ्रष्ट देश होता, असा उल्लेख मोदींनी त्यांच्या पहिल्या विदेश दौऱ्यावेळी केला होता. हे जर सत्य असेल तर आज राहुल गांधींनी मांडलेले मुद्दे देशाविरोधी कसे असू शकतील अशी विचारणा केली.“

काँग्रेसच्या आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांनी जाहीरपणे राहुल गांधींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. विरोधक आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशिवाय आजही कोणतेही विधेयक संमत होऊ शकत नाही असे सांगत शर्मा यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.