का झाला हा व्हिडियो व्हायरल ?
 महा त भा  12-Sep-2017कोच्ची : फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजकल काहीही व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मात्र इंडियन स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे ओणम सणानंतर काही प्राध्यापकांनी केलेल्या नृत्याचा व्हिडियो एकाएकी व्हायरल झाला आणि त्यामध्ये नृत्य करणाऱ्या एका प्राध्यापिकेला चक्क सिनेमासाठी मागण्या देखील यायला लागल्या.

Embeded Objectकोच्ची येथील इंडियन स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे ओणम सणाच्या निमित्ताने 'फ्लॅशमॉब' आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये एक प्राध्यापिका शेरिल जी काडवान या तरुण प्राध्यापिकेने देखील आकर्षक नृत्य सादर केले. प्रसिद्ध मल्याळी गाणे 'झिमकी कमल' या गाण्यावर या प्राध्यापकांनी नृत्य केले. मात्र त्यामध्ये ठळकपणे दिसली ती शेरिल आणि काही तासांमध्ये यूट्यूवर या व्हिडियोला ८० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. आणि शेरिल अर्ध्यारात्रीतून प्रसिद्ध झाली. तिला सिनेमांसाठी ऑफर्स येवू लागले, तिच्या नावाने फेसबुकवर खाती निघू लागली आणि काय काय. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता, मात्र केवळ शेरिल प्रसिद्ध झाल्याने इतरांना वाईट नक्कीच वाटले असणार. 


 


केवळ हाच नाही तर याच गाण्यावर एका परिवारानी ओणम निमित्त तयार केलेला आणखी एक घरगुती व्हिडियो यूट्यूबवर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडियोला ३२  लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकूण या गाण्यातच जादू आहे. 

Embeded Objectया गाण्यातील भाषा कळत नसली तरी गाण्याचा ठेका कुणालाही नृत्य करण्यास भाग पाडेल त्यातून शेरिलचे हाव भाव आणि नृत्य बघता हा व्हिडियो पुन्हा पुन्हा नक्कीच बघावासा वाटेल.