संघात ट्रोलींगचे समर्थन केले जात नाही - सरसंघचालक
 महा त भा  12-Sep-2017


 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ट्रोलींगचे कुठल्याही प्रकारचे समर्थन केले जात नाही, तथा इंटरनेटवर फोफावणारा आक्रमकपणाला देखील थारा दिला जात नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्ली येथे ब्रेकफस्ट ब्रीफिंग नामक कार्यक्रमात संवाद साधताना ते बोलत होते.

Embeded Object


इंडिया फाउंडेशनच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी ब्रेकफस्ट ब्रीफिंग नामक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी ५० देशांचे राजनयिक, तथा राजदुतांशी संवाद साधला. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मांडली.


आपल्या देशात एकाधिकारशाही भेदभावाला थारा दिला जात नाही, किंबहुना जगाची एकता कशी राखता येईल याचा विचार भारतात केला जातो, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ७० लाखापेक्षा अधिक सेवाकार्य आरोग्य, ग्रामीण विकास, तथा शिक्षण क्षेत्रात चालवत आहे, अशी माहिती सरसंघचालकांनी उपस्थितांना दिली.

Embeded Object


या कार्यक्रमात केंद्रीय उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा, आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव उपस्थित होते.

प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप हे संघाद्वारे चालविले जात नाही, तथा संघ भाजपद्वारे चालविला जात नाही.