भारतात दिव्यांग नागरिकांसाठी होणार ‘इन्क्लुसिव इंडिया समिट’
 महा त भा  12-Sep-2017

 

नवी दिल्ली: दिव्यांग नागरिकांसाठी एक सर्वसमावेशी समाजाचे निर्माण करण्यासाठी भारतात ‘सर्वसमावेशी भारत परिषद’ अर्थांत ‘इन्क्लुसिव इंडिया समिट’चे आयोजन करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यातील मंगळवारी ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्था यांचा समावेश असणार आहे.

 

माहिती व प्रसारण मंत्रालय आणी समाजामध्ये दिव्यांग नागरिकांचा विकास करण्यासाठी ज्या संस्था कार्य करतात त्या संस्था या परिषदेमध्ये भाग घेणार आहेत. भारतीय समाजाला सर्वसमावेशी समाज बनविण्यासाठी समाजातील दिव्यांग व्यक्तींचा सामाजिक कार्यांत समावेश करणे गरजेचे आहे असे मत सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी मांडले आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

भारतीय सरकारकडून सुरु करण्यात आलेला हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यामुळे दिव्यांग नागरिकांना शिक्षण, रोजगार संधी, उदरनिर्वाह उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. ते स्वत:च्या हिम्मतीवर त्यांचे जीवन जगण्यास प्रवृत्त व्हावेत असा यामागील सरकारचा उद्देश आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.