इर्मा वादळ अमेरिकेच्या किनारपट्टीवर दाखल
 महा त भा  10-Sep-2017फ्लोरिडा : कॅरेबियन सागरात निर्माण झालेले इर्मा चक्रीवादळ अमेरिकेतील फ्लोरिडाच्या दक्षिण किनारपट्टी येऊन धडकले आहे. वादळामुळे फ्लोरिडामध्ये तशी १३० किमी वेगाने वादळी वारे वाहू लागले असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून फ्लोरिडामध्ये अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार आज सकाळी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर इर्मा वादळ येऊन धडकले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर या अगोदरच किनारपट्टी जवळील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून अनेक नागरिकांना शहरातील स्टेडीयम तसेच इतर मोठ्या ठिकाणी आश्रयासाठी घेऊन जाण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून इमारतींचे देखील नुकसान झाले आहे. वादळामुळे मोठमोठे वृक्ष उमळून पडल्यामुळे तसेच रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहतूक देखील ठप्प पडली आहे. वादळी पावसामुळे भूस्खलन होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे फ्लोरिडातील डोंगराळ आणि टेकड्याजवळील नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Embeded Object

Embeded Object


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या वादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी सैन्येच्या काही तुकड्या तसेच आपत्ती व्यवस्थापणासाठी पथके देखील रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी अमेरिका सरकारकडून काही टोल फ्री क्रमांक आणि संकेतस्थळ देखील सुरु करण्यात आली आहे. 

Embeded Object

Embeded Object