वॉशिंग्टन येथे होणार भारत अमेरिकेचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास
 महा त भा  10-Sep-2017


 

सध्या सुरु असलेल्या भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यांतर्गत १४ ते २७ सप्टेंबर २०१७ या कालावधीत अमेरिकेतल्या वॉशिंग्टन येथे जॉइंट बेस लुईस मॅकॉर्ड येथे संयुक्त युद्ध अभ्यास-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरु असलेल्या संयुक्त सैन्य प्रशिक्षण आणि संरक्षण सहकार्यामधील हा सर्वात मोठा युद्ध सराव आहे. उभय देशांमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या संयुक्त युद्ध सरावांमधील हा १३ वा युद्ध सराव आहे.

 

या युद्ध अभ्यासामध्ये उभय देशाच्या सैन्याने ब्रिगेड पातळीवर संयुक्त योजना तयार करुन एकीकृतपणे बटालियन स्तरावर प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. एकमेकांचा संस्थात्मक आराखडा आणि युद्ध प्रक्रिया समजून घेण्याच्या उद्देशाने या अभ्यासात वेगवेगळ्या परिस्थिती हाताळण्याचा सराव केला जाईल. जेणेकरुन उभय देशांमध्ये उच्चस्तरीय भागीदारी शक्य होईल. यामुळे जगात उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही आकस्मिक घटनेचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये एकवाक्यता राहील.