‘भूमी’ या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित
 महा त भा  09-Aug-2017

 

अभिनेता संजय दत्त याचा नुकताच येणारा चित्रपट ‘भूमी’ याचे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. संजय दत्त या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून संजय दत्त या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांपुढे येणार आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने या चित्रपटात संजय दत्त यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

Embeded Object

संजय दत्त याने स्वत: त्याच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. ‘तो नेहमी भूमीचे संरक्षण करेल आणि ती माझी भूमी आहे’ अशा शब्दांमध्ये संजय याने या पोस्टरचे प्रदर्शन केले आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती संजय दत्तने दिली आहे.

 

दिग्दर्शक ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट संजय दत्त याच्या चित्रपट क्षेत्रातील जीवनाला काही वेगळे वळण देतो काय हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.  कारण बऱ्याच दिवसानंतर संजय दत्त चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पुढे येत असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.