प्रत्यक्ष कर संकलनात पहिल्या ४ महिन्यात १९.१ टक्के वाढ
 महा त भा  09-Aug-2017

 

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये पहिल्या ४ महिन्यात प्रत्यक्ष कर संकलनात १९.१ टक्के वाढ झाली आहे. जुलै २०१७पर्यंत झालेल्या कर संकलनातील परताव्याची रक्कम १.९० लाख कोटी आहे.

Embeded Object

याविषयी राज्य अर्थमंत्री संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात  प्राप्तिकर विवरण भरणा करणाऱ्यांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंत पहिल्या चार महिन्यांत ४१ टक्के प्राप्तिकर संकलन पूर्ण झाले आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष २०१७-१८साठीच्या एकूण अर्थसंकल्पीय अंदाजापैकी (Budget Estimates) १९.५ टक्के प्रत्यक्ष करांचे संकलन पहिल्या चार महिन्यात करण्यात आले आहे. एकूण महसुल संकलनाविषयी विचार करताना व्यावसायिक प्राप्तिकरात (CIT) ७.२ टक्के तर व्यक्तिगत प्राप्तिकरात (PIT) १७.५ टक्के वाढ झाली आहे.

Embeded Object

करदात्यांना दिला जाणारा परतावा वजा करून निव्वळ कर संकलनात वाढ झाल्याचे निरीक्षण महसुल विभागाने नोंदवले आहे. यामध्ये व्यावसायिक प्राप्तिकर संकलनात २३.२ टक्के तर व्यक्तिगत प्राप्तिकर संकलनात १५.७ टक्के निव्वळ वाढ झाली आहे.

Embeded Object

प्राप्तिकर संकलनात वाढ झाल्याने विकास कामांसाठीच्या निधीसाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीसाठी शासनाकडे आश्वासन निधी जमा होत आहे. त्यामुळे पहिल्या चार महिन्यातील कर संकलनात झालेली वाढ पुढेही कायम राहिल्यास जीएसटी, कॅशलेस इंडिया व विमुद्रीकरण असे शासनाचे निर्णय देशाच्या एकूण विकासासाठी हितावह ठरत असल्याचे सिद्ध होईल.

 Embeded Object