शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : तुझं माझं रक्षाबंधन... (सिन्हा V/S सिन्हा)
 महा त भा  07-Aug-2017
आज रक्षाबंधन. बहीण भावांच्या अतूट नात्याचा एक सुंदर सण. या दिनामुळे भाऊ आणि बहीण एक मेकांच्या आणखी जवळ येतात असे म्हणतात. मात्र आधी काही कारणांनी दूर गेलेल भाऊ बहीण या दिनाच्या निमित्ताने जवळ येवू शकतात? हा प्रश्न या लघुपटात दाखवण्यात आता आहे.

एक मुलगी हॉटेलमध्ये आधीपासूनच बुक केलेल्या रूमचा ताबा घेण्यासाठी भांडत असते, कारण तिने बुक केलेली खोली तिच्या आधी आणखी कुणालातरी देण्यात आली असते. तितक्यात ज्या व्यक्तीला ती खोली दिलेली असते, तो येतो, योगायोगाने दोघांचेही अडनाव सिन्हा असते. आणि इथून सुरु होतात त्यांची भांडणं. पण नुकत्याच भेटलेल्या दोन व्यक्ती इतक्या हक्काने का भांडतील? कारण जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा..

Embeded Object'एसआयटी' तर्फे प्रदर्शित या लघुपटात प्रसिद्ध अभिनेते इकबाल खान आणि अभिनेत्री अदिती गुप्ता यांनी काम केले आहे. त्यांचा अभिनय अतिशय सुरेख आहे.

आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, ज्यावेळी आपल्याला एका खंद्या 'सपोर्टसिस्टम' ची गरज असते. आणि अनेकदा हा आधार आपल्याला आपल्या भाऊ किंवा बहीणीकडून मिळत असतो. त्याच आधाराला आणि त्याच नात्याला आजचा हा लघुपट समर्पित आहे. एकदा नक्की बघा... आणि आपल्या भाऊ किंवा बहीणीसोबत शेअर देखील करा..

- निहारिका पोळ