नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे साजरे केले रक्षाबंधन
 महा त भा  07-Aug-2017

 

नवी दिल्ली: बहिण-भावाचे घट्ट नाते निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज देशातील सगळ्या बहिणी आपल्या भावांसोबत हा सण साजरा करत असतांना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे काय मागे राहणार आहेत. आज नरेंद्र मोदी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आणि वृदांवनच्या विधवा महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

Embeded Object

 

दरम्यान मणिपूरच्या राज्यपाल व माजी लोकसभा अध्यक्ष नजमा हेप्तुल्ला यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली व मणिपूरमधील फ्लाईंग डॉक्टर योजनेच्या उद्घाटनास येण्याचे आमंत्रण दिले.

Embeded Object

 


यावेळी शाळेच्या छोट्या मुलींनी नरेंद्र मोदी यांना राखी बांधून त्याचा आशीर्वाद घेतला तर महिलांनी त्यांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला असून त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. आज विविध राजकीय क्षेत्रातील मंडळींनी देखील रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला.

 Embeded Object

तसेच नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील शाळेच्या मुलींसोबत आणि विविध संस्थेच्या मुलींसोबत आज राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सगळ्या मुलींनी आनंदात राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना राखी बांधली आणि त्यांच्याशी मनापासून संवाद साधला.