Rakhi Spl : प्रत्येकालाच आकर्षित करणारे बॉलिवूडमधील भावा-बहिणींचे प्रेम...
 महा त भा  07-Aug-2017


सण कोणताही असो त्यामध्ये सहभागी होऊन तो सण सोशल मीडियावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची बॉलिवूडकरांची जुनीच सवय. आणि या सवयींचेही चाहते मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. आज देशभरात साजरा करण्यात येणार्‍या रक्षाबंधन दिनानिमित्त बॉलिवूडमधील नामवंत भाऊ-बहिण हा सण सेलिब्रेट करून त्या संबंधिचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. तुम्हा-आम्हाला आकर्षित करणार्‍या या सर्व घडामोडी आम्ही यामाध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवित आहोत...

राजकन्येचा प्रेमळ भाऊ!

जेनेलिया डिसूजा-देशमुखने बॉलिवूडमध्ये फार काम केलेले नाही, पण तरीही तिच्या आजवरच्या कलाकृतींमुळे तिचे वेगळे अस्तित्त्व वेळोवेळी जाणवत राहीले. त्यातच तिने काही वर्षांपूर्वी रितेश देशमुख याच्याशी लग्न केले व बर्‍याच कालावधीपासून आता ती बॉलिवूडपासून दूरच आहे. आज रक्षाबंधनच्या निमित्ताने तिने ट्विटरवर तिचा भाऊ निगेल बरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्ट मध्ये तिने लिहीलयं, “राजकन्येला कशा पद्धतीची वागणूक मिळते हे बघायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला निगेल डिसूजा सारखा भाऊ पाहिजे!’’

Embeded Object

“तुम्ही कधी मोठे झालात हे कळालचं नाही...’’
परिणीती चोप्राने तिचे दोन भाऊ सहज व शिवांग यांच्या सोबत एक छानसा फोटो पोस्ट केला असून सोबतच त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र देखील लिहीले आहे. त्यात ती त्यांना म्हणत आहे की, “तुम्ही दोघंही कधी मोठे झालात कळालचं नाही. असं वाटतयं की कालच तुम्हाला दोघांना मी माझ्या खांद्यावर खेळवत होते. आपण एकमेकांची काळजी घेता घेता कधी चांगले मित्र बनलो लक्षातच आलं नाही. तुम्ही दोघेही नेहमीच माझ पहिलं प्रेम असाल!

Embeded Object

 

Embeded Object

“तुच माझी ताकद आहेस...’’
नेहमी वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध असणारी मल्लिका शेरावत आज सोज्वळ मुलीसारखी वागत असून तिने तिचा भाऊ विक्रम लांबा याला राखी बांधतानाचा एक संस्कारी फोटो पोस्ट केला आहे. त्यावर तिने कॅप्शन सुद्धा लिहीली आहे. ‘तु जगातला सर्वोत्तम भाऊ आहेस व माझी ताकद म्हणून सतत माझ्या सोबत उभा राहिल्यामुळे तुझे आभार!’ 

Embeded Object

तुमच्या बहिणीला सक्षम करा
तुषार कपूरने त्याची बहिण एकता कपूर सोबतची सेल्फी ट्विटरवर पोस्ट केली असून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या बहिणांना सक्षम बनवा असं सांगण्यास देखील तो विसरलेला नाही. एकताने हा सेल्फी काढला आहे व यात तुषार आणि त्याचा मुलगा आपल्याला दिसून येतात.

Embeded Object