देशात विविध ठिकाणी राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन
 महा त भा  07-Aug-2017

 

आज राष्ट्रीय हातमाग दिवस असल्याने देशात विविध ठिकाणी विविध सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रीय हातमाग दिवसाचे अहमदाबाद येथे आज उद्घाटन केले असून विविध राज्यात या दिवसाचे औचित्य साधून हातमागावर तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

 Embeded Object

Embeded Object

आज आंध्रप्रदेश येथे हातमाग दिवसानिमित्त ‘हातमाग फेरीचे’ आयोजन करण्यात आले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. केंद्रीय वस्त्र राज्य मंत्री अजय तामटा यांनी गुवाहाटी येथे हातमाग कार्यक्रमांचे आयोजन केले. तेलंगणा, हैदराबाद येथे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 Embeded Object

Embeded Object

सिक्कीम आणि आयआयएम कलकत्ता येथे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे राष्ट्रीय हातमाग दिवसाचे हे तिसरे वर्ष असून २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे याचा शुभारंभ करण्यात आला होता. आज संपूर्ण देशात हातमाग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Embeded Object