Raksha Bandhan : तुमच्या बहिणीला सुरक्षा देऊ नका...
 महा त भा  07-Aug-2017


अक्षय कुमार उर्फ सर्वांचा आवडता अक्की नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाबाबत वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. मग ते चित्रपटातून असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातून, तो सातत्याने महिलांना स्वत:च्या बळावर उभं राहण्यासाठी प्रेरित करीत असतो. असाच काहीसा प्रयत्न त्याने रक्षाबंधनदिनाच्या निमित्ताने केला आहे. अक्षयची बहिण अलका हिचा एक व्हिडिओ अक्कीने स्वत:च्या ट्विटरवरून पोस्ट केला आहे.


या व्हिडिओत अलका अलका असं म्हणतीये की, “राजू अगदी सुरूवातीपासूनच मला सांगायचा की ‘अपना ध्यान खूद रखो’, वडील गेल्यानंतरही राजूने लवकरच त्यांच्या जबाबदार्‍या स्वत:च्या खांद्यावर घेतल्या परंतु तेव्हाही त्याचं म्हणण तेच असायचं की, ‘अपना ध्यान खूद रखो’...(अक्षय कुमारचं खर नावं राजीव भाटीया आहे.) पण अलकाच्या आयुष्यात असा एक दिवस आला की तेव्हा तिला राजूच्या या वाक्याचा खरा अर्थ कळला आणि तेव्हापासून ती आत्मनिर्भर झाली.

Embeded Object

अक्षय कुमार हे नेहमीच सर्व महिलांना सांगत आला आहे की, तुम्ही स्वत: तुमची सुरक्षा करा कोणावरही अवलंबून राहू नका. अशाच प्रकारचा काहीसा संदेश त्याने आजही देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुमच्या बहिणीला सुरक्षा देऊ नका, तिला सक्षम बनू द्या!’ असा संदेश तमाम बंधु-भगिनींना त्याने दिला आहे.