जिल्हातील विकासकामे दिलेल्या मानकानुसार पूर्ण करावीत : रणजीत पाटील
 महा त भा  06-Aug-2017


अकोला : जिल्हात सुरु असलेली सर्व विकास कामे दिलेल्या मानकानुसार तातडीने आणि योग्यरित्या पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले. जिल्हामध्ये सुरु असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला.


जिल्हा परिषदेच्या काही शाळेच्या इमारतीची अवस्था चांगली नाही, अशा शाळेच निरीक्षण करुन त्या शाळांची वर्गवारी करावी. व त्यानंतर या शाळांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा असे ते म्हणाले. तसेच जिल्हयात चालू असलेल्या नविन रस्ताचे कामे दर्जेदार व विहित मुदतीत करावीत, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिल्या.


तसेच पिक विमा संबंधीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येवू नये याची दक्षता घ्यावी. जिल्हयात शेतकऱ्यांचे तुर खरेदी, संबंधीताचे पंचनामे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे करावे असे देखील ते म्हणाले. शेतकऱ्याचे तूर खरेदीचे कार्यवाही काटेकोरपणे ३१ ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावे. कोणतेही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही. यांची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.