गश्मीर रक्षाबंधनला नाही, मात्र बहिण म्हणते ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही!
 महा त भा  05-Aug-2017

 

अभिनेता गश्मीर महाजनीचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये आपल्या भेटीसाठी येतोय. चित्रपटाची जशी प्रतिक्षा आपण करतोय, तितकीच मेहनत संपूर्ण चित्रपटाची टीम महाराष्ट्रभर पूर्वप्रसिद्धीसाठी करत आहे. पण रविवारी असलेल्या रक्षाबंधनासाठी गश्मीरची बहीण म्हणतेय माझा भाऊ यावेळी रक्षाबंधनसाठी घरी येऊ शकणार नसेल तरी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’!

 

गश्मीरपेक्षा तेरा वर्षांनी मोठ्या रश्मी महाजनी-वैद्य गश्मीरच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. चित्रपट क्षेत्रातील सततच्या कामांमुळे दरवेळी तो ताईकडे बेळगावला जाऊ शकतोच असे नाही. पण ताई मात्र भावावरचे प्रेम आणि माया कायम ठेवत अतिशय नियोजनपूर्वक राखी त्याच्यापर्यंत पोहोचवते. याविषयी गश्मीर म्हणतो, तेरा वर्षांच्या फरकामुळे ताई माझी दुसरी आई आहे. माझ्यात आणि ताईमध्ये कोणतेच गुपित नाही. कारण मला तिला कोणतीही गोष्ट सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही’. ती माझी मैत्रिण, फिलॉसॉफर आणि गाईडही आहे..”


रक्षाबंधन हे भावंडांमधील अतिशय महत्त्वाचा क्षण. ‘शुटिंगसाठी कुठेही असलो तरी ताईने पाठवलेली राखी एक दिवस आधीच पोहोचते.’ गश्मीर सांगतो, “दरवर्षी आम्हाला एकत्र रक्षाबंधन साजरं करता येतंच, असे नाही. पण मी जगात कुठेही असलो, तरीही मला माझ्या पत्त्यावर एक दिवस आधीच राखी पोहोचते. एकदा मी शुटिंगसाठी मध्यप्रदेशातल्या खूपच आत असलेल्या भागात होतो. तो पत्ता शोधणं कठीण असतानाही तिची राखी एक दिवस आधी पोहोचली. यंदाही हा नियम चुकणार नाही, ह्याची मला खात्री आहे. ताईच्या प्रेमळ धाकामुळे राखी मिळताच ती हातात बांधून सेल्फी नक्की तिला पाठवतो. यावर्षीही हा नियम चुकवणार नाही. हा आमच्यातील फार भावुक क्षण आहे.”

 

प्रत्येक भावा-बहिणीसाठी आपलासा असा क्षण आधुनिक काळातील कामांमधील व्यस्ततेमुळे पारंपारिकपणे साजरा करणे शक्य नसले तरी सेल्फी हा रक्षाबंधनासाठी तितकाच सुरक्षित ठरो, असे गश्मीर सांगतो. असेच सगळे भाऊ-बहिणी दरवर्षी रक्षाबंधन आनंदाने साजरे करोत यासाठी गश्मीर सगळ्यांना सेल्फी घ्या पण आपण सुरक्षा असू तरच आनंद द्विगुणित होईल हे आठवणीने सांगतो, ते फार महत्त्वाचे आहे.