जूनियर वर्ल्ड कुस्ती स्पर्धेत मंजू कुमारी हिला कांस्य पदक
 महा त भा  04-Aug-2017

 

फिनलँड: फिनलँडमधील ताम्पेरे येथे सुरु असलेल्या जागतिक जुनिअर कुस्ती स्पर्धेत देशाची महिला कुस्तीपटू मंजू कुमारी हिने कांस्य पदक पटकावले आहे. मंजू कुमारी हिने ५९ किलोग्रॅम वजनी गटात हे पदक मिळवले आहे. या स्पर्धेत तिने युक्रेनच्या इलोना प्रोकोपेवनियुक हिला २-० च्या फरकाने मागे टाकून कांस्य पदकावर मोहोर लावली आहे.

 

मंजूने पहिल्या सामन्यात बल्गेरियाच्या अलेक्सांद्रिया काशिनोवा हिला ५-१ च्या फरकाने हरवले. मात्र उपांत्यपूर्व स्पर्धेत मंजू कुमारीला जपानच्या युजूरु कुमानो हिने ०-१० अशा मोठ्या फरकाने हरविल्यामुळे मंजूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. मात्र मंजू हिने कांस्य पदक कायम ठेवले आहे.

 

मंजू कुमारी हिने दक्षिण आशियाई २०१६ स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.