पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक
 महा त भा  03-Aug-2017


 

पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाईट pakistan.gov.pk हॅकर्सकडून हॅक करण्यात आली होती. त्यावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र झळकत होते. वेबसाईटवर अशोकचक्र, हुतात्मा भगतसिंग यांचे चित्र आणि जन-गण-मन हे भारतीय राष्ट्रगीत यावर बराच वेळ झळकत होते.

ही वेबसाईट कुणी हॅक केली याचा अद्यापही थांगपत्ता पाकिस्तान सरकारला लावता आलेला नाही. सध्या वेबसाईट पुन्हा आधीच्या स्वरुपात दिसत आहे. वेबसाईटवर १५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा असा देखील संदेश देण्यात आला होता. आणि हॅक बाय 'Ne0-h4ck3r'

दरम्यान यावर पाकिस्तान सरकारतर्फे कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील यावर कुठलेही भाष्य केलेले नाही. वेबसाईट हॅक झाल्यानंतर सगळीकडे चर्चा झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने याला दुरुस्त केले.