आमीर, ‘जेएचएमएस’ तु कधी बघतोयस ते मला सांग
 महा त भा  03-Aug-2017


शाहरूख, सलमान किंवा आमीर या तिनही खानांना बॉलिवूडच्या टॉपवर विराजमान होण्याची नेहमीच इर्षा असते. ही स्पर्धा अगदी गेल्या वर्षीपर्यंत कायम होती. पण काही महिन्यांपासून या तिघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढले असून स्पर्धेच्या दृष्टीने ते थोडे बाजूला होऊन आता एकमेकांच्या चित्रपटांचा सपोर्ट करताना दिसत आहेत. शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ (जेएचएमएस) हा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. तर याच चित्रपटाच्या निमित्ताने आमीर आणि शाहरूखमधील सोशल मीडियावरील संवाद त्यांच्या मैत्रीपूर्ण नात्याला वृद्धिंगत करत असल्याचे जाणवते आहे.

Embeded Object

शाहरूख, अनुष्का शर्मा आणि इम्तियाज अली या त्रिकुटाचा ‘जेएचएमएस’ उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने अनेक बॉलिवूडकर या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देत आहेत. यातच आणखी एक मोठ्या नावाची भर पडली आहे आणि हे नाव आहे, आमीर खानच. आमीरने या शाहरूख, अनुष्का व इम्तियाजला शुभेच्छा दिल्या असून हा चित्रपट हिट होईल असा विश्‍वासही व्यक्त केलाय!

Embeded Object

आता आमीरचा हा मोठेपणा बघून शाहरूख तरी कुठे मागे राहतोय, तोही पुढे सरसावला. काल आमीरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. आमीरच्या याच ट्विटला प्रतिसाद देत शाहरूखने हा ट्रेलर खुपच प्रेमळ वाटत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तु माझा ‘जेएचएमएस’ हा चित्रपट कधी बघणार आहेस, तेही मला कळाव, असं बोलायलाही तो विसरला नाहीये.

एकूणच खान लोकांनी एकमेकांना सपोर्ट करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ट्यूबलाईट’ सलमान खानच्या ट्यूबलाईट चित्रपटात शाहरूखने पाहुणा कलाकाराची भूमिका साकारली होती आणि आता त्यानंतर शाहरूख - आमीरमधील हे सोशल मीडियावरील संभाषण बरचं काही सांगून जाते. आता अजून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतयं ते पाहू...