रवीना टंडनचे हे ट्वीट होत आहे व्हायरल...तुम्ही पहिले का?
 महा त भा  28-Aug-2017


आपल्या मुलीचा इतिहासाचा अभ्यास घेत असताना हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने त्यातील चूक हायलाईट करून ती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्यानुसार ‘कुतुबुद्दीन ऐबक हा अतिशय दानशूर होता त्याने हिंदूंना चांगली वागणूक दिली. तसेच तो लाखो रुपयांचं बक्षीस देत असे त्यामुळे त्याला ‘लखबक्ष’ असे म्हटले जायचे. त्याने हिंदूंची मंदिरे तोडून त्याच्या साहित्याचा वापर दर्गे आणि मशिदी बांधण्यासाठी केला.’ असा पुस्तकातील उताऱ्याचा फोटो रावीनाने ट्वीट केला आहे. इतिहासाच्या पुस्तकात एकाच उताऱ्यात विरोधाभासी विधाने असल्याचे तिने म्हटले आहे.

यावर रवीना टंडनने, “कुतुबुद्दीन ऐबकचे आपण आभारच मानले पाहिजेत की त्याने हिंदूंना न मारता फक्त मंदिरे लुटली आणि हिंदूंच्या संस्कृतीवर घाला घातला” असे उपहासात्मक वक्तव्य केले आहे. या विधानानंतर एकच गदारोळ झाला आहे आणि सोशल मिडियावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.