प्लॅटफॉर्मवर आले स्टेनलेस स्टीलचे बेंचेस
 महा त भा  22-Aug-2017


पनवेल : अ पनवेल हे असे एक रेल्वेस्थानक आहे, जिथून लांब पल्ल्राच्रा गाड्याही धावतात. त्या अनुषंगाने प्रवासी संघाने केलेल्या विनंतीनुसार आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे रेल्वेस्थानकातील ५, ६ व ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर स्टेनलेस स्टीलचे एकूण १ लाख किमतीचे १० दर्जेदार बेंचेस तसेच स्थानकाच्या प्लॅटफॉर्म परिसराची स्वच्छता करून गोळा होणारा कचरा जमा करून ठेवण्यासाठी म्हणून लायन्स क्लब ऑफ न्यु पनवेल (स्टील टाऊन) तर्फे स्टेनलेस स्टीलच्या एकूण १५ हजार रुपयाच्या मजबूत १० डस्टबीन देणगी दाखल देण्यात आल्या आहेत. पनवेल प्रवासी संघ व पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समिती या सदस्यांच्या उपस्थितीत पनवेल रेल्वे स्थानक प्रबंधक दिनेश गुप्ता यांचेकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले आहेत.


प्रवासी संघ व स्थानक प्रबंधक यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व लायन्स क्लब ऑफ न्यु पनवेल (स्टील टाऊन) यांचे आभार व्यक्त केले आहेत. या प्रसंगी पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ न्यु पनवेल (स्टील टाऊन) सदस्य यशवंत ठाकरे, प्रवासी संघाचे कार्यवाह व उपनगरिय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट, प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर पनवेल जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के.जी.म्हात्रे, प्रवासी संघाचे सदस्य गौतम अग्रवाल, शब्बीर होरा, रेल्वे पार्सल खात्याचे प्रमुख आनंद, सेक्शन इंजिनियर, तिकीट तपासनीस कार्यालयाचे प्रशासन अधिकारी उपस्थित होते.