पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य : रणजीत पाटील
 महा त भा  22-Aug-2017


अकोला : काळाबरोबरच आज पत्रकरिता देखील बदलली आहे. बदललेल्या पत्रकारितेच्या आजच्या या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी या नात्याने पत्रकारांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी काल केले. शेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यमे अधिस्वीकृती समितीची बैठकीत ते बोलत होते.


पत्रकार हा समाज आणि शासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. समाजातील सामान्य नागरिकांचे आश्रू पोसण्याबरोबरच त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविण्याचे काम पत्रकार करतात. काळानुरुप पत्रकारितेत मोठया प्रमाणात बदल झाला आहे. त्याबरोबरच या क्षेत्रातील ताणही वाढलेला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना आरोग्य व सुरक्षेचे कवच आवश्यक आहे.' असे ते म्हणाले.


यावेळी समितीची अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर, मराठवाडा विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, नागूपर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी आदींसह सर्व उपसंचालक, समितीचे सदस्य उपस्थित होते. जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सत्कार केला.