जंगल पुनर्निर्माण अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल - सुधीर मुनगंटीवार
 महा त भा  22-Aug-2017

 

कोल्हापूर: राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियान या लोक सहभागातून होत असलेल्या सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सहभागी होण्याचा हा क्षण आपल्यासाठीही आनंदाचा व अभिमानाचा आहे, असे सांगून या अभियानातून ग्रीन कोल्हापूर साकारले जाईल असा विश्वास, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांनी व्यक्त केला.

 

वन विभाग आणि जंगल पुननिर्माण अभियान यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी येथे राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुनर्निर्माण अभियानाचे उदघाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. आज याठिकाणी विविध प्रकारची जंगली वृक्षांची १२०० रोपे लावण्यात आली.

 

राजर्षि छत्रपती शाहू प्रेरित पारंपारिक जंगली वृक्ष व जंगल पुननिर्माण अभियान अंतर्गत सव्वा लाख जंगली वृक्ष रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. सव्वा लाख वृक्ष लागवडीच्या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन निर्मिती होईल आणि प्रदुषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांवर उपाय होईल. त्यामुळे या अभियानाला आपण मनापासून शुभ कामना देत आहे. या उपक्रमात वन विभाग संपूर्णपणे सहभागी असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करु या आणि पिढ्यानपिढ्यांसाठी घनदाट जंगलांची निर्मिती करु या असे आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.