अखेर सेजलचा अर्थ सगळ्यांना समजला?
 महा त भा  02-Aug-2017

 

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि बॉलीवूडची क्युट अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ यातील ‘सेजल’नावाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनुष्का नेहमी करीत असते. मात्र ‘सेजल’चा अर्थ सांगण्याच्या आधीच शाहरुख तिला गप्प करून टाकत असतो. मात्र आता शेवटी अनुष्काने ‘सेजल’ नावाचा अर्थ सगळ्यांना सांगितला आहे.

Embeded Object

सेजल म्हणजे ‘फुर्रर्र’ असे सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच शेअर केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी सेजल नावाचा अर्थ चाहते ‘फुर्रर्र’ असाच लावत आहेत. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानचे प्रोडक्शन असलेले ‘रेड चिली’च्या ट्वीटर अकाऊंटने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

या व्हिडीओमधून अनुष्काने ‘सेजल’ या नावाचा अर्थ लोकांना विचारला असता लोकांनी ‘फुर्रर्र’ असे उत्तर दिले आहे. त्यामुळे या ‘फुर्रर्र’ची भानगड काय आहे? हे तर आपल्याला या शुक्रवारीच कळणार आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे.