चीन रोबोट निर्मितीसाठी देणार ६०० मिलियन युआन
 महा त भा  02-Aug-2017बीजिंग : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेल्या चीनने देशात रोबोटनिर्मितीला चालना देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन सरकारने मानवासारखे बुद्धिमान रोबोट बनवण्यासाठी ६०० मिलियन युआन (अंदाजे ५.६९ अब्ज रुपये) माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे.


चीनच्या 'मेड इन चायना २०२५' च्या धोरणाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून या वर्षाच्या अखेरपर्यंत चीनमध्ये स्वदेशी बनावटीचे ४२ रोबोट बनवण्यात येणार असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. या रोबोटच्या निर्मीती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच वापर करण्यात येणार असून मानव करू शकणारे सर्व कामे हे रोबोट करू शकतील. तसेच रोबोटिक रिसर्च आणि इंडस्ट्रीयल रोबोटच्या निर्मितीला देखील यातून चालना देण्यात येईल अशी माहिती चीनच्या विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


चीनच्या 'मेड इन चायना २०२५' च्या धोरणाअंतर्गत २०२० पर्यंत चीनने १५ लाख स्वदेशी बनावटीच्या रोबोटची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच बरोबर देशातील माहिती तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, स्वयंचलित यंत्रणा या क्षेत्रात अधिक संशोधन आणि निर्मितीला चालना देणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असणार आहे.