जिल्ह्यात निर्माण होतेय 'पाणीटंचाई' !
 महा त भा  16-Aug-2017


अकोला : जिल्ह्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांना पाण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात जलस्त्रोतांमधील पाणीसाठी कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.


हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज साफ फोल ठरवत गेल्या दीड महिन्यापासून पावसाने अकोला आणि आजूबाजूच्या जिल्ह्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याच्या पाण्याचा साठा कमी झाला आहे. जलयुक्त शिवारमुळे अनेक ठिकाणी नवीन पाणीसाठे जरी निर्माण झाले असले, तरी ते पाणी पिण्यासाठी अगदीच अयोग्य आहे. त्यामुळे जिल्ह्याला येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाई सामोरे जावे लागू शकते.


यासंबंधी जिल्हा प्रशासनाकडून देखील आता हालचाल केली जाऊ लागली आहे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी येत्या काही दिवसांमध्ये ठोस उपाययोजना तयार करण्यात याव्यात, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रणजीत पाटील यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले होते. तसेच नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.