दिलीप कुमार यांच्या मानस पुत्राने घेतली त्यांची भेट
 महा त भा  16-Aug-2017मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना भेटण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आहे. मात्र या सगळ्यात एक खास भेट नुकतीच घडली. ती म्हणजे त्यांचा मानसपु्त्र म्हणजेच शाहरुख खान याने त्यांची घेतलेली भेट.

Embeded Object


दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर खात्यारुन या भेटीचे छायाचित्र पोस्ट करत म्हटले की, "दिलीप साहेबांचा मानसपुत्र आज त्यांच्या भेटीसाठी आला आहे. रुग्णालयातून घरी आल्यापासून दिलीप साहेबांची प्रकृती आता बऱ्यापैकी उत्तम आहे."

Embeded Objectदिलीप कुमार यांनी ऑगस्ट महीन्याच्या सुरुवातीला किडनीच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आजच्या त्यांच्या या भेटीचे छायाचित्र पाहता, त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण असणार असे दिसते.