जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त
 महा त भा  15-Aug-2017

 

अकोला : राज्य शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार या महत्त्वकांक्षी प्रकल्पाअतंर्गत आपोती बु. येथे खोदण्यात आलेल्या डोहामध्ये साठलेल्या जलाचे पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते आज भूमीपूजन करण्यात आले. मागील महिन्याभरात झालेल्या पावसामुळे या डोहामध्ये ११ टीसीएस इतका पाणीसाठा निर्माण झाला असून हे जलयुक्त शिवारच्या कामाचे फलीत असल्याचे प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली.


जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांमुळे जिल्हयातील एकूण २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. त्या निमित्त जिल्ह्याचे आपोती बु. येथील या डोहामध्ये नव्याने साठलेल्या पाणीसाठ्याचे पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आपोती येथील लोणार नाल्यावर लघुसिंचन विभागातर्फे ४५० मीटर लांब, १२ मी रूंदी व सरासरी २ मी खोलीचे डोह खोदण्यात आला होता. या डोहामध्ये ११ टीसीएम पाणीसाठा जमा झाला असून यामुळे सुमारे ७ हेक्टर जमिन सिंचन क्षेत्राखाली आहे. 


याचा पार्श्वभूमीवर आपोती“बु. क्र २ येथे देखील अशाच प्रकारचा डोह उभारण्यात आला असून यामुळे सुध्दा ७ हेक्टर जमिनीवर सिंचनाखाली येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जलयुक्त शिवारच्या कामांमुळे जिल्ह्यासह राज्यभरातील पाण्याची टंचाई नक्कीच दूर होईल, असेही ते यावेळी म्हणाले.