या स्वातंत्र्यदिनी एकत्र येवून नव्या भारताचा संकल्प करुयात : रविशंकर प्रसाद 
 महा त भा  12-Aug-2017नवी दिल्ली :  या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'संकल्प से सिद्धी' ची घोषणा दिल्यानंतर आता सगळेच त्यादृष्टीने कार्य करण्यास तत्पर झाले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येवून नवीन भारताच्या निर्माणाच्या दृष्टीने कार्य करुयात अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 

Embeded Objectट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावेळी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानिमित्त 'संकल्प से सिद्धी' असे सूत्र दिले होते. त्यांनी देखील जनतेला या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांनी एकत्र येवून भारताला गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद यासारख्या नकारात्मक गोष्टींपासून स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले आहे. 

भारत छोडो आंदोलनाच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त देखील केंद्र सरकारतर्फे जनतेला नवीन भारताच्या निर्माणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता, डिजिटल पेमेंट मध्ये वाढ, भ्रष्टाचार आणि दहशतवाद मुक्त भारत याचा समावेश करण्यात आला आहे.