राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ
 महा त भा  12-Aug-2017
 

 
पनवेल : राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट व शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

रास्त धान्य भाव दुकान चालविणार्‍या दुकानदारास कमी प्रमाणात कमिशन मिळत असल्याने दुकानाचे वीजबिल, जागेचे भाडे व इतर खर्च वजा करून त्यांना दिल्या जाणार्‍या कमिशनमध्ये रास्त धान्य दुकान चालविणे शक्य होत नव्हते.

त्यामुळे या बाबींचा विचार करून मंत्री गिरीश बापट यांनी दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ केली असून ती आता ७० रुपयांऐवजी १५० रुपये मिळणार आहे. आता दुपटीपेक्षा जास्त कमिशन दुकानदारांना मिळणार असल्याने आ. ठाकूर यांनी गिरीश बापट आणि शासनाचे आभार मानले.