राष्ट्रीय एकता दलाच्या जिल्हाध्यक्षपदी रामविलास चौहान
 महा त भा  12-Aug-2017


पनवेल : राष्ट्रीय एकता दलाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी पनवेल येथील रामविलास चंद्रदेव चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय एकता दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा शिवाजी न्यायनीत यांनी सन २०१७ ते २०१८ सालाकरिता चौहान यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

’’समाजामध्ये सामाजिक समता, बंधुभाव वाढवून आपल्या भारत देशाची एकता व अखंडता मजबूत करण्यासाठी ’बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे पवित्र कर्तव्य समजून सामाजिक बांधिलकी पार पाडण्याचे प्रयत्न चौहान करतील,’’ असा सार्थ विश्वास व्यक्त करून राष्ट्रीय एकता दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा शिवाजी न्यायनीत यांनी चौहान यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष विजय सावंत, कार्याध्यक्ष रवींद्र सर्जे, सरचिटणीस राजू इंगळे, सचिव राहुल वाघमारे, रणजित पवार, संतोष पवार, अशोक जाधव, अनिल राठोड, पुनीत वर्मा, जाकीर शेख, सोनू शेख, दिनेश वाळोदे, सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.