एकजुटीच्या तुफानाने बरसला ‘रंग बावरा श्रावण’
 महा त भा  12-Aug-2017

 
 
श्रावण म्हणजे उन्हं सरींचा खेळ, सणांची रेलचेल, निर्सगाच्या औदार्याचा आणि मानवी भाव भावनांचा एक अनोखा मेळ! असा हा रिमझिम सरींची बरसात करणारा अवर्णनीय श्रावण अविस्मरणीय झाला तो एकाच रंगमंचावर विवेकानंद प्रतिष्ठानच्या २५० बालगायकांच्या सुमधूर तसेच उद्बोधीत स्वरांच्या बरसातीने! नुकतीच कांताई सभागृहात ‘रंग बावरा श्रावण’ ही श्रावण गीतांची सुमधूर मेजवानी जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आली होती. 
 
श्रावणसींबरोबर गीतसरींमध्ये तन-मन चिंब करण्याबरोबरच बदललेले श्रावणाचे रुप पुन्हा पूर्ववत करण्यास आपणच प्रयत्न करायला हवे, हा पर्यावरण संवर्धक उद्देश या कार्यक्रमामागे होता. या वर्षाचा लांबलेला व दीर्घकाळ दांडी मारणारा पाऊस आणि मराठवाड्यात तर गेले ४८ दिवस न आलेला पाऊस, जलधारेऐवजी सर्वांचा वेदना देणार्‍या कोरड्या दुष्काळाचे भय व घामाच्या धारा या पार्श्‍वभूमीवर हा कार्यक्रम सार्‍यांना खूप काही विचार-चिंतनधन देणारा ठरला. विद्यार्थी व पालकांनाही चिरंतन प्रेरणा देता झाला. हाच आयोजनामागचा विचार होता, तो सफल झाला. 
 
 
त्यानंतर अग्गो बाई ढग्गो बाई..., पिर-पिर पावसाची, टप-टप थेंब..., आला रे आला पाऊस..., ये रे घना..., रिमझिम पाऊस तसेच बालकविंची अजरामर रचना..., श्रावणमासी हर्षमानसी अशी एकापेक्षा एक सरस भावगीते, पाऊस गीते, बालगीते तसेच मिया मल्हार रागाची बंदिश सादर करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
 
निवेदन, वादन हे सुध्दा विद्यार्थ्यांनीच केले. विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब. गो. शानभाग, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. गीत मालिकेतील काही गीते संगीत शिक्षकांनी रचली तसेच स्वरबध्द केली होती आणि यशस्वीतेसाठी सर्व विभागातील संगीत शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 
या स्वरसंध्येचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्रावण केवळ व्रत वैकल्ये, सण उत्सव, मज्जाच मजा अशी संकल्पना न राहता बरसणारा श्रावण फुलविणे, रुजविणे आणि टिकविणे हे आपलेच दायित्व आहे. हे सर्वांना लक्षात येणे कारण मानवाच्या चुकींमुळे भीषण तोंड देत आहोत.
 
एक होता राजा एक होती राणी ही गोष्ट सांगता सांगता एक होते ‘पाणी’ ही गोष्ट सांगायची वेळ येऊ नये, म्हणून जलबचतीचा एकजुटीचा संदेश प्रतिष्ठानच्या २५० बालगायकांनी ऐकाच वेळी एकाच रंगमंचावर समारोपाच्या गीतातून दिला.
 
तसेच एकाच रंगमंचावर २५० विद्यार्थ्यांचे समूहगान उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरले. लहानमुलांच्या या कार्यक्रमातून जनमानसात एक एक जलजागृती, पाणी बचतीचे महत्व याविषयी जाणीव निर्माण झाली. विवेकानंद प्रतिष्ठान हा एक नविण्यपूर्ण, उल्लेखनीय व अभिमानास्पद आणि अविस्मरणीय उपक्रम झाला.