गोरखपूरमधील मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे नाही
 महा त भा  12-Aug-2017


योगी सरकारचे स्पष्टीकरण

गोरखपूर (उ.प्र.) : शहरातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये (बीआरडी) रुग्णांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरु असून यामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आले आहे. तसेच प्रसारमाध्यमांवर देण्यात येणाऱ्या या केवळ अफवा असून अशा कोणत्याही गोष्टींवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन देखील सरकारने केले आहे.


बीआरडी रुग्णालयातील सर्व परिस्थिती योग्य असून रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. गोरखपूर जिल्हाधिकारी स्वतः रुग्णालयात उपस्थित असून रुग्णालयातील सर्व सेवांचा ते स्वतः आढावा घेत आहेत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूविषयी पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या फक्त अफवा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Embeded Object

Embeded Object

Embeded Object


बीआरडी रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे काल ३० बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर दाखवली जात होती. यामुद्द्यावरून उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्षांनी योगी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली होती. तसेच आरोग्य मंत्री, रुग्णालयातील कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, व हे सरकार विसर्जित केले जावे, अशी मागणी देखील विरोधकांकडून केली जात होती. परंतु सरकारने यावर आपले स्पष्टीकरण दिले असून या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे म्हटले आहे.

Embeded Object