गोरखपूर प्रकरणी खरी माहिती सरकारला पुरवा : योगी
 महा त भा  12-Aug-2017

 

गोरखपूर(उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे झालेल्या मुलांच्या मृत्यूचे तथ्य सरकारपुढे मांडा आणि त्याचा खरा अहवाल देखील सरकारला पुरवा असे स्पष्ट आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. आज लखनऊ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गोरखपूर येथे झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा केली असून यावर त्वरित कारवाई करा आणि माहिती द्या असे आदेश दिले.   

Embeded Object

Embeded Object

या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी केंद्राकडून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून यावर लवकर कारवाई केली जावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Embeded Object

Embeded Object

८ ऑगस्टला-१२ मुलांचा, ९ ऑगस्टला-९ मुलांचा, १० ऑगस्टला-२३ मुलांचा तर ११ ऑगस्टला-११ मुलांचा मृत्यू बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झाला होता. हा आकडा अतिशय चिंताजनक असल्याने यावर लवकर एक समिती नेमून अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. या रुग्णालयाला आम्ही भेट दिली असून तथ्य लवकर पुढे आणा त्यामुळे दोषींना शिक्षा देखील लवकर केली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

 Embeded Object