भारत-श्रीलंका कसोटी सामना: तिसऱ्या कसोटीत लोकेशची उत्तम खेळी
 महा त भा  12-Aug-2017

 

 

पाल्लेकेले(श्रीलंका): भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात झाली असून आज दिवसाअखेर भारताने आपला डाव संपवला आहे. आज भारताची सुरुवात पाहिजे तेवढ्या प्रमाणात चांगली झाली नसून भारत सध्या ३२९ धावा तर ६ बाद स्थितीमध्ये खेळत आहे. मात्र लोकेश राहुल याने त्याचे अर्धेशतक पूर्ण केले असून खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे.

Embeded Object

के. एल. राहुल आणि शिखर धवन आज प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले होते. ८५ धावांवर के. एल. राहुल तर १०३ धावांवर शिखर धवन यांना माघारी पाठवण्यात श्रीलंकेला यश मिळाले. त्यानंतर केवळ सतरा धावांवर अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा याला ८ धावांवर बाद करण्यात आले. त्यामुळे आज भारतीय संघाच्या हातून सामना निसटू लागला असल्याचे दिसून आले.

Embeded Object

विराट कोहलीकडून या सामन्यात बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र तो ४२ तर आर.अश्विन ३१ धावांवर तंबूत परतले. सध्या भारत ३२९ अशा धाव संख्येवर असून भारताचे ६ गडी बाद आहेत. उद्याच्या सामन्यात आजचा खेळ पूर्ण केला जाईल. उद्या हार्दिक पंड्या आणि वृध्दिमान साहा त्यांची अपूर्ण खेळी पूर्ण करेल. सध्या पंड्या १ तर साहा १३ या धाव संख्येवर खेळत आहे.

Embeded Object

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या या मालिकेत भारताकडे २-० अशी आघाडी आहे. भारताने या अगोदर गॉल आणि कोलोंबो येथे लागोपाठ झालेले दोन्ही कसोटी आपल्या नावावर केले आहेत, त्यामुळे या मालिकेत भारताचे पारडे जड आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून श्रीलंकेच्या घराच्या मैदानावर त्यांचा पूर्णपणे सुफाडा साफ करण्याची संधी भारताकडे आहे.